Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:29 PM2022-07-19T13:29:23+5:302022-07-19T13:30:05+5:30

अपघातात घराचे आणि गाडीचे मोठे नुकसान

The driver lost control and the car rammed into the house in satara | Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली

Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली घरात, सुदैवाने जिवीतहानी टळली

Next

सातारा : साताऱ्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गाडी चक्क घरात घुसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात सोमवारी दुपारी सातारा-कास रस्त्यावर झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका घरात पर्यटकाची गाडी अचानक घुसली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जखमी झाले नाही. परंतु या अपघातात घराचे आणि गाडीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी दुसऱ्या गाडीच्या साह्याने घरामध्ये शिरलेली गाडी दोरीच्या साह्याने ओढून बाहेर काढली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Web Title: The driver lost control and the car rammed into the house in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.