सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 11:08 AM2022-02-19T11:08:40+5:302022-02-19T11:15:44+5:30

आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला

The explosion of the cylinder shook Karad, destroying twenty four houses in a fierce fire | सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक

सिलेंडरच्या स्फोटाने कराड हादरले, भीषण आगीत चोवीस घरे जळून खाक

Next

कराड : येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरात असलेल्या  वस्तीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपुर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र भयावह आगीत २४ घरे जळून खाक झाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथे न्यायालयाच्या समोरील बाजूस बापूजी साळुंखे यांचा पुतळा परिसर आहे. या परिसराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या वस्तीत मध्यरात्री अचानक आग लागली. एका घराला लागलेली आग वेगाने वाढत गेली. आग लागल्याने महिलांसह नागरिक आरडाओरडा करत रस्त्यावर आले. त्या महिलांसह आसपासच्या नागरिकांनी आग लागलेल्या घरांशेजारील इतर घरात झोपलेल्या कुटूंबांना जागे करत बाहेर आणले. तोपर्यंत आग प्रचंड वाढत गेली.

आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला. सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने शहरात खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांसह पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीत २४ घरातील साहित्य जळून खाक झाले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमुऴे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यांची तात्पुरती राहण्याची सोय नगरपरिषद शाळा क्रमांक तीन येथे केली आहे.

Web Title: The explosion of the cylinder shook Karad, destroying twenty four houses in a fierce fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.