Satara Crime: घोरपडीची शिकार; वनविभागाकडून तीघे ताब्यात, ढवळेवाडी येथे कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:10 PM2023-08-04T12:10:39+5:302023-08-04T12:10:53+5:30

आदर्की : ढवळेवाडी (नेवसेवस्ती), ता. फलटण येथील ढवळेवाडी-नांदल रोडवर मांस खाण्याच्या उद्देशाने संशयितांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी तिघांना वनविभागाने ...

The forest department detained three people in connection with hunting Ghorpadi in satara | Satara Crime: घोरपडीची शिकार; वनविभागाकडून तीघे ताब्यात, ढवळेवाडी येथे कारवाई

Satara Crime: घोरपडीची शिकार; वनविभागाकडून तीघे ताब्यात, ढवळेवाडी येथे कारवाई

googlenewsNext

आदर्की : ढवळेवाडी (नेवसेवस्ती), ता. फलटण येथील ढवळेवाडी-नांदल रोडवर मांस खाण्याच्या उद्देशाने संशयितांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन कारवाई केली. ही घटना बुधवारी घडली.

दत्तात्रय शंकर रनवरे (वय ४८), मोहन नानबा माने (३८), शरद हणमंत नेवसे (४०, सर्वजण ढवळेवाडी, ता. फलटण) असे वनविभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

ढवळेवाडी, ता. फलटण येथील वरील संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २. (१६) ९५०, ३९, ५० अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, तसेच घटनास्थळावरून शिकार करण्याकामी वापरण्यात आलेले साहित्य लाकडी ओंडका, कोयता, पातेले, डबा व वन्यजीव घोरपडचे कातडे, नख्या, शिजवलेले मांस ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, मनोहर म्हसेकर, वनपाल राजेंद्र कुंभार, वनपाल राजेंद्र आवारे, वनरक्षक विक्रम निकम, राहुल निकम, सारिका लवांडे यांनी कारवाई केली. अधिक तपास साताऱ्याचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल फलटण करीत आहेत.

Web Title: The forest department detained three people in connection with hunting Ghorpadi in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.