Satara News: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले, धरणात मुबलक पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:05 PM2023-02-07T12:05:51+5:302023-02-07T12:06:12+5:30

सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू

The gates of Koyna Dam were opened by a foot, with abundant water storage in the dam | Satara News: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले, धरणात मुबलक पाणीसाठा 

Satara News: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले, धरणात मुबलक पाणीसाठा 

googlenewsNext

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात अद्यापही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच पूर्वेकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे सोमवारी सायंकाळी धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडून नदीपात्रात १ हजार ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

कोयना धरणाचीपाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी आहे. धरणात सध्या ७९.११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू आहेत. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करुन नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

नवीन तांत्रिक वर्ष सुरू व्हायला तीन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही धरणात सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. त्यातच पूर्वेला सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातील विसर्ग सुरू ठेवण्याबरोबरच धरणाचे दोन वक्र दरवाजे सोमवारी सायंकाळी एक फुटाने उघडून नदीपात्रात १ हजार ५०० असा एकूण ३ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Web Title: The gates of Koyna Dam were opened by a foot, with abundant water storage in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.