Maratha Reservation: साताऱ्यात उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

By सचिन काकडे | Published: November 2, 2023 01:13 PM2023-11-02T13:13:31+5:302023-11-02T13:14:21+5:30

सातारा : मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात साखळी आंदोलन सुरू असून, गुरुवारी सकाळी एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली. प्रकाश भोसले असे त्यांचे ...

The health of the hunger striker deteriorated in Satara | Maratha Reservation: साताऱ्यात उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

Maratha Reservation: साताऱ्यात उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

सातारा : मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात साखळी आंदोलन सुरू असून, गुरुवारी सकाळी एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली. प्रकाश भोसले असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार  करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाची धग कायम आहे. विविध संघटनांचा या आंदोलनाचा पाठिंबा वाढत चालला असून, साडेपाचशेहून अधिक गावांत नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. 

या उपोषणात सहभागी प्रकाश भोसले यांची प्रकृती गुरुवारी खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असून, उपोषणस्थळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.

Web Title: The health of the hunger striker deteriorated in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.