ठाणे शासकीय रुग्णालयातील घटना वेदनादायी, रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:00 PM2023-08-14T14:00:00+5:302023-08-14T14:00:43+5:30

जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई

The incident in Thane Government Hospital is painful, an inquiry committee will be appointed in the death of patients says Chief Minister | ठाणे शासकीय रुग्णालयातील घटना वेदनादायी, रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमणार : मुख्यमंत्री

ठाणे शासकीय रुग्णालयातील घटना वेदनादायी, रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमणार : मुख्यमंत्री

googlenewsNext

सातारा : ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेली घटना वेदनादायी आहे. ही घटना शासनाने गांभीर्याने घेतली असून, सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खासगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे रुग्ण वेगवेगळ्या दिवशी या ठिकाणी दाखल झाले होते.

या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The incident in Thane Government Hospital is painful, an inquiry committee will be appointed in the death of patients says Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.