Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 05:04 PM2024-08-10T17:04:28+5:302024-08-10T17:04:49+5:30

पेट्री : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ ...

The Kas plateau bloomed with white flowers, planning the eve of the season | Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग

Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग

पेट्री : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागल्याने येत्या आठ-दहा दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास किंवा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्यास दहा ते पंधरा दिवसांनी फुलांच्या मुख्य बहराला प्रारंभ होईल. त्यामुळे वनसमितीची हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग सुरू झाल्याचे दिसत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पाऊस आणि दाट धुक्यात कास पठार काहीसे लुप्त झाल्यासारखे वाटत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कास परिसरात पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने कास पठारचे मनमोहक दृश्य दिसू लागले आहे. पांढऱ्या रंगाच्या चवर या फुलांनी कास पठार बहरले असून, काही ठिकाणी गालिचे पाहायला मिळत आहेत. 

गेंद, तेरडा, सीतेची असवे, टुथब्रश, नीलिमा, रानहळद आदी विविध दहा ते पंधरा जाती-प्रजातीच्या रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला असल्याने वनसमितीसह पर्यटकांना हंगामाची चाहूल लागली असून, वनसमितीची हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग सुरू झाली असून, वाहनतळ, स्वच्छता, रस्त्यात आलेली झुडपे हटविणे, खड्डे भरणे, हंगामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आदी कामे सुरू असून, उर्वरित नियोजन येत्या दहा-बारा दिवसांत पूर्ण करण्याचे सुरू आहे.

Web Title: The Kas plateau bloomed with white flowers, planning the eve of the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.