Satara: तीन कोटी लुटीतील मुख्य सूत्रधार पोलिसांना शरण, याप्रकरणी दहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:46 PM2024-10-29T16:46:27+5:302024-10-29T16:46:59+5:30
कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक तीन कोटीच्या लूटप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कऱ्हाड शहर पोलिस ...
कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक तीन कोटीच्या लूटप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दहा जणांना अटक केली आहे. दहा आरोपींकडून २ कोटी ८९ लाख ३४ हजार रुपये हस्तगत केले. त्यानंतर पुन्हा केलेल्या तपासात आणखी साडेचार लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
मुंबईहून हुबळीकडे तीन कोटी रुपये घेऊन निघालेली कार कऱ्हाडनजीकच्या मलकापूर येथे अडवून लूट केली होती. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी तपास करून दहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९५ टक्के रक्कम हस्तगत केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ सलिम शेख (रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, सोमवारी या प्रकरणातील फरार आसिफ सलिम शेख (रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) हा स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम ताशिलदार तपास करीत आहेत.