सातारा तापला; ४० चा टप्पा ओलांडला, वर्षातील उच्चांकी तापमान; उकाड्याने नागरिक घामाघूम

By नितीन काळेल | Published: May 12, 2023 07:34 PM2023-05-12T19:34:27+5:302023-05-12T19:34:49+5:30

सतारा : वारे बंद, ढगाळ वातावरण नाहीसे आणि वातावरण कोरडे झाल्याने सातारा शहराचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे ...

The mercury in Satara city has reached 37 degrees, Citizens sweat from the heat | सातारा तापला; ४० चा टप्पा ओलांडला, वर्षातील उच्चांकी तापमान; उकाड्याने नागरिक घामाघूम

सातारा तापला; ४० चा टप्पा ओलांडला, वर्षातील उच्चांकी तापमान; उकाड्याने नागरिक घामाघूम

googlenewsNext

सतारा : वारे बंद, ढगाळ वातावरण नाहीसे आणि वातावरण कोरडे झाल्याने सातारा शहराचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी कमाल तापमाने ४० चाही टप्पा ओलांडला. या वर्षातील हे उच्चांकी तापमान ठरले. तर कडक ऊन आणि उकाड्याने सातारकर घामाघूम होत असल्याने हैराण झाले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिले. मार्चपर्यंत जाणवणारी थंडी फेब्रुवारीतच गायब झाली होती. तर फेब्रुवारीच्या अखेरीसच सातारा शहराचा पारा ३७ अंशापर्यंत पोहोचलेला. त्यामुळे यंदा उन्हाळा सातारकरांना असह्य करणारी अशी स्थिती होती. मागील दोन महिन्याचा विचार करता शहराचा पारा कायम ३० अंशावर आहे. एकदाच कमाल तापमान ३९.९ अंशापर्यंत गेले होते.

त्यानंतर वळवाचा पाऊस झाल्याने पारा ३२ अंशापर्यंत खाली आला होता. यामुळे सातारकरांना कडक उन्हाचा अनुभव आला नव्हता. मात्र, चार दिवसांपासून पारा सतत वाढत चालला आहे.
सातारा शहरात मागील आठवड्यात पाऊस झाला. त्यावेळी पारा खालावला होता. मात्र, काही दिवसांतच तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी तापमान ३३.७ अंश नोंद झाले. मात्र, शुक्रवारी वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ४०.४ अंश पारा होता. यामुळे सातारकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. तसेच दुपारच्या सुमारास उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे टाळले.

दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचाही पारा वाढू लागलाय. शुक्रवारी ३३.६ अंशावर तापमान होते. यामुळे महाबळेश्वरचा पाराही ३५ अंशाकडे झुकू लागल्याचे दिसून आले.


सातारा शहरातील कमाल तापमान असे...

दि. १ मे ३४.५, २ मे ३४.५, ३ मे ३५.२, ४ मे ३५.४, ५ मे ३५.३, दि. ६ मे ३६.९, ७ मे ३५.९, ८ मे ३३.७, ९ मे ३५.२, दि. १० मे ३७.८, ११ मे ३९.३ आणि १२ मे ४०.४


पूर्व भागात सूर्य कोपला...

साताऱ्याच्या पूर्व भागात माण, खटाव, फलटण तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक राहते. त्यामुळे तेथे उन्हाच्या झळा असह्य होतात. सध्या या दुष्काळी भागातील पाऱ्याने ४० अंशाचा टप्पा केव्हाच पार केला आहे. सूर्य कोपत असलातरी बळीराजा आणि मजुरांना काम करावेच लागत असल्याचे दिसत आहे.

Web Title: The mercury in Satara city has reached 37 degrees, Citizens sweat from the heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.