सातारा: रिमांड होममधून अल्पवयीन बालकानं काढला पळ, निरीक्षक गृहात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 05:37 PM2022-06-11T17:37:27+5:302022-06-11T17:48:03+5:30
संबंधित मुलाचा निरीक्षक गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
सातारा : एका गुन्ह्यात ताब्यात घेतलेला १३ वर्षांचा विधिसंघर्ष बालक काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निरीक्षक गृहातून पळून गेला. या घटनेमुळे निरीक्षक गृहात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलाचा निरीक्षक गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बझार येथील निरीक्षक गृहाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सर्व मुलांना तेथील एका इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री आठ वाजता सर्व मुले जेवण करण्यासाठी जात होती. त्यावेळी १३ वर्षांचा विधिसंघर्ष बालक तेथून पसार झाला.
काही वेळानंतर हा प्रकार बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी सातारा बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे बालगृहातील कर्मचारी विजय सपकाळ यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.