माॅर्निंग वाॅकला गेले, चोरट्याने पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले; जरंडेश्वर नाक्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:18 PM2022-05-17T18:18:10+5:302022-05-17T18:19:38+5:30

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

The old man was robbed by the police, the incident at Jarandeshwar Naka satara | माॅर्निंग वाॅकला गेले, चोरट्याने पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले; जरंडेश्वर नाक्यावरील घटना

माॅर्निंग वाॅकला गेले, चोरट्याने पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले; जरंडेश्वर नाक्यावरील घटना

Next

सातारा : ‘मी पोलीस असून, इथे चोरी झाली आहे. आमची तपासणी सुरू आहे. तुम्ही इकडे या तुम्हाला चेक करायचे,’ आहे असे सांगून एका वृद्धाकडील दागिने घेऊन चोरट्याने पलायन केले. ही खळबळजनक घटना १६ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तानाजी परबती संकपाळ (वय ५९, रा. कुशी दत्तनगर, नागेवाडी, ता. सातारा) हे दोन दिवसांपूर्वी सदर बझार येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे आले आहेत. सोमवारी सकाळी ते जरंडेश्वर नाक्यावरील मारुती मंदिराजवळून ते माॅर्निंग वाॅकला निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून एक युवक तेथे आला. ‘मी पोलीस असून, चोरी झाली असल्यामुळे आमची तपासणी सुरू आहे. तुम्ही इकडे या तुम्हाला चेक करायचे,’ आहे असे म्हणून तानाजी संकपाळ यांना त्याने बोलावून घेतले. त्या चोरट्याने गाडीवर बसूनच संकपाळ यांना तुमच्याकडे दागिने असतील तर या रुमालात ठेवा, असे सांगितले.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संकपाळ यांनी गळ्यातील साेन्याची चेन आणि अंगठी, मोबाईल काढून त्याच्याजवळ दिले. त्यानंतर त्या चोरट्याने रुमालात दागिने ठेवण्याचा बहाणा करून तो तेथून पसार झाला. पुढे गेल्यानंतर संकपाळ यांनी रुमाल उघडला असता रुमालात केवळ मोबाईल असल्याचे दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तानाजी संकपाळ हे सेवानिवृत्त असून, ते तलाठी पदावर कार्यरत होते.

Web Title: The old man was robbed by the police, the incident at Jarandeshwar Naka satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.