नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच नारळाने खाल्ला भाव!, शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:03 PM2024-10-02T13:03:03+5:302024-10-02T13:04:14+5:30

सातारा : सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळानेदेखील चांगलाच भाव खाल्ला आहे. नारळाच्या दरात ...

The price of coconut has increased by Rs 800 per hundred | नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच नारळाने खाल्ला भाव!, शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ.. वाचा

नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच नारळाने खाल्ला भाव!, शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ.. वाचा

सातारा : सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळानेदेखील चांगलाच भाव खाल्ला आहे. नारळाच्या दरात शेकड्यामागे तब्बल ८०० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत आणखी २०० रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. सध्या किरकोळ बाजारात एका नाराळासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.

सातारा जिल्ह्यात तामिळनाडू, कर्नाटक राज्यांतून नारळांची आवक होते. यंदा पावसामुळे नारळ उतरविण्याचे काम ठप्प आहे. उत्पादन कमी व वाढलेली मागणी हे दरवाढीचे प्राथमिक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवात दर स्थिर होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे.

पावसाचा मोठा फटका नारळ उत्पादकांना बसला आहे. शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत आणखी २०० रुपयांची वाढ होईल असे सध्याचे चित्र आहे. - संजय मोरे, नारळ व्यावसायिक

Web Title: The price of coconut has increased by Rs 800 per hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.