नऊ जागांचे निकाल जाहीर, समितीला सहा तर संघाला तीन जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:29 PM2022-11-20T13:29:43+5:302022-11-20T13:30:00+5:30

शिक्षक समिती बँकेच्या मतमोजणी सुरू असून नऊ जागांचे निकाल जाहीर झाले असून सहा जागांवर शिक्षक समितीचे उमेदवार विजयी झाले

The results of nine seats were announced, the committee won six seats and the team won three seats | नऊ जागांचे निकाल जाहीर, समितीला सहा तर संघाला तीन जागांवर विजय

नऊ जागांचे निकाल जाहीर, समितीला सहा तर संघाला तीन जागांवर विजय

Next

सातारा :

शिक्षक समिती बँकेच्या मतमोजणी सुरू असून नऊ जागांचे निकाल जाहीर झाले असून सहा जागांवर शिक्षक समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत तर तीन जागांवर शिक्षक संघाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

कराड पाटण, आरळे आणि जावलीत संघाने बाजी मारली तर नागठाणे, परळी, महाबळेश्वर, वाई, खंडाळा आणि फलटण येथे समितीने विजय मिळवला. जावलीची जागा समितीने अवघ्या चार मतांनी गमावली.

कराड मतदारसंघात शिक्षक संघाचे महेंद्र जानुगडे हे ३१६ मतांनी विजयी झाले. नागठाणे मतदारसंघात शिक्षक समितीचे विशाल कणसे १५८ मतांनी विजयी झाले. आरळे मतदारसंघात शिक्षक संघाचे नितीन राजे हे २७ मतांनी विजयी झाले. परळी मतदारसंघात शिक्षक समितीचे तानाजी कुंभार १४८ मतांनी विजयी झाले. जावली मतदारसंघात जोरदार टस्सल झाली. शिक्षक संघाचे विजय शिर्के हे अवघ्या ४  मतांनी विजयी झाले. 

महाबळेश्वर मतदारसंघात शिक्षक समितीच्या संजय संकपाळ १४८ मते मिळवून विजयी झाले. वाई मतदारसंघात शिक्षक समितीच्या नितीन फरांदे यांनी ७२ मते मिळवून विजय मिळवला. खंडाळा मतदारसंघात शिक्षक समितीच्या विजय ढमाळ हे १९८ मते मिळवून विजयी झाले. 


फलटण मतदारसंघात शिक्षक समितीच्या शशिकांत सोनवलकर यांनी ६२ मतांनी विजय मिळवला. उर्वरित मतदार संघातील मोजणी सुरू असून महिला राखीव मतदरसंघाची मोजणी शेवटी घेतली जाणार आहे.विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळून करत जल्लोष केला.विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळून करत जल्लोष केला.

Web Title: The results of nine seats were announced, the committee won six seats and the team won three seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.