चोरीचा जनरेटर विक्रीस आले अन् पोलिसांना सापडले; साताऱ्यातील प्रकार

By नितीन काळेल | Published: September 8, 2023 07:45 PM2023-09-08T19:45:48+5:302023-09-08T19:45:59+5:30

दोघेजण ताब्यात; चार तासांत गुन्हा उघडकीस

The stolen generator was sold and the police found | चोरीचा जनरेटर विक्रीस आले अन् पोलिसांना सापडले; साताऱ्यातील प्रकार

चोरीचा जनरेटर विक्रीस आले अन् पोलिसांना सापडले; साताऱ्यातील प्रकार

googlenewsNext

सातारा : सातारा तालुक्यातील सैदापूर येथील जनरेटर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात उघडकीस आणला. जनरेटर विक्रीस आणल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच याप्रकरणी सातारा शहरातील दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, सैदापूर येथून जनरेटरची चोरी झाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन कारवाईची सूचना केली होती. असे असतानाच पोलिस निरीक्षक देवकर यांना पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमधून (एमएच, ०७, पी. १३११) दोघेजण सातारा शहरातील महानुभव मठाजवळ चोरीचा जनरेटर विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर देवकर यांनी पथकाला सतर्क करुन कारवाईची सूचना केली. या पथकाने कारवाई करीत टेम्पो आणि जनरेटर असा २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर या प्रकरणी शुभम दीपक कडव (रा. गडकर आळी, सातारा) आणि प्रतीक सुभाष मुळे (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांना ताब्यात घेऊन तालुका पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केले. पोलिसांनी गुन्हा दाखलनंतर चार तासांत उघडकीस आणला.

पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. सहायक निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील, हवालदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, राकेश खांडके, अमित माने, अविनाश चव्हाण, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृश्वीराज जाधव, संकेत निकम, शिवाजी गुरव आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: The stolen generator was sold and the police found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.