कुत्री मोकाटच; अडीच वर्षात ५२ हजार लोकांवर हल्ला! १० जणांचा मृत्यू 

By नितीन काळेल | Published: September 13, 2024 10:18 PM2024-09-13T22:18:59+5:302024-09-13T22:19:48+5:30

घराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळण्यात येतो. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत असे होत नाही.

The street dogs Attack on 52 thousand people in two and a half years 10 people died  | कुत्री मोकाटच; अडीच वर्षात ५२ हजार लोकांवर हल्ला! १० जणांचा मृत्यू 

प्रतिकात्मक फोटो



सातारा : सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ३३ जणांना चावा घेतल्याची घटना आता घडली असलीतरी मागील अडीच वर्षांत जिल्ह्यातील ५२ हजारांवर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झालाय. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चावा घेणारी बहुतांश कुत्री भटकीच आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा विषय पुन्हा एेरणीवर आला आहे. 

            घराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळण्यात येतो. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत असे होत नाही. तसेच त्यांच्या वाढीवरही नियंत्रण राहत नाही. या कुत्र्यांकडूनच अधिक करुन नागरिक, जनावरांवर हल्ले होतात. यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही पुढे येतात. आताही सातारा शहरात तब्बल ३३ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय. यामुळे घबराटीचे वातावरण आहे. पण, मागील काही वर्षातील आकडेवारी विचारात घेता कुत्र्यांच्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे चिंता करण्यासारखीच स्थिती आहे.

जिल्ह्यामधील कुत्र्यांच्या चाव्याची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार मागील अडीच वर्षांच्या काळात तब्बल ५२ हजार ६७६ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलाय. हे प्रमाण नक्कीच अधिक आहे. तर त्यापूर्वी २०१७ या वर्षात १६ हजार १३१, २०१८ या वर्षात २१ हजार ६८ नागरिकांवर हल्ला केल्याची नोंद आहे. तर २०१९, २० या दोन वर्षात हल्याचे प्रमाण वाढलेले होते. ०१९ मध्ये २६ हजार ३९२ तर २०२० मध्ये २६ हजार २५७  जणांना चावा घेतला आहे.

२० पशुगणनेनुसार नोंद...
भटके श्वान संख्या - ३६,३६१
पाळीव श्वान - ४५,१७१

तालुकानिहाय कुत्रा चावा
१ जानेवारी २०२२ ते ३१ आॅगस्ट २०२४
जावळी १६१७
कऱ्हाड ७५४५
खंडाळा ३४९५
खटाव ५५९०
कोरेगाव ४३६६
महाबळेश्वर १४८२
माण ५६९५
पाटण ३८१४
फलटण ७७१८
सातारा ७००८
वाई ४३४६
 

Web Title: The street dogs Attack on 52 thousand people in two and a half years 10 people died 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा