डोंगराच्या काळ्या मैनेचा आस्वाद यंदा कमीच

By दीपक शिंदे | Published: April 20, 2023 06:13 PM2023-04-20T18:13:47+5:302023-04-20T18:14:03+5:30

करवंदाच्या जाळ्या वणव्यात होरपळल्या

The taste of the black mane of the mountain is less this year | डोंगराच्या काळ्या मैनेचा आस्वाद यंदा कमीच

डोंगराच्या काळ्या मैनेचा आस्वाद यंदा कमीच

googlenewsNext

सणबूर : करवंद घ्या.. करवंद घ्या... अशी आरोळी देत गावोगावी रखरखत्या उन्हातून डोंगरकपारीतून धनगर मंडळी डोक्यावर पाटी घेऊन गल्लीबोळांतून पोटासाठी भटकत आहेत.

घोटील व काळगावचा धनगरवाडा डोंगरकपारीत वसला आहे. या विभागात डोंगराच्या रानमेव्याचा आनंद चाखायला मिळतो. वाल्मीक पठारावरील धनगरवाड्यावरील महिला, पुरुष उन्हाची पर्वा न करता डोक्यावर करवंदाची पाटी घेऊन या रानमेव्याची विक्री करताना दिसत आहेत. त्यांनी तयार केलेले माफ व त्यावर डोंगराच्या मैनेची किंमत ठरवून ते गल्लीबोळातून फिरताना दिसत आहेत. मे महिना सुरू झाला की करवंदांच्या हंगामाला सुरुवात होते. करवंदे घेऊन येणाऱ्या पुरुष महिलांजवळ करवंदे, जांभळे घेण्यासाठी लहान मुले गर्दी करतात.

ही धनगर मंडळी उन्हातान्हातून करवंद काढण्यासाठी डोक्यावर करवंदाची पाटी घेऊन दिवसभर करवंदीच्या जाळ्यातून फिरताना अंगावर काट्यांचे ओरखडे उठतात. ते कोणालाच न सांगता फक्त करवंदे घ्या करवंदे एवढीच आरोळी देऊन रानमेव्याची चव ग्रामस्थांना चाखायला देत असतात. या दुर्गम भागातील परिस्थिती हलाखीची असल्याने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या दिवसात करवंदे विकण्यासाठी हे लोक ओळखतात. यातून कसे बसे दोन वेळच पोट भरते इतकाच नफा त्यांना मिळत असतो. गावोगावी, बाजारात डोंगरची मैना नि:संकोचपणे दुकान बांधून हे उदरनिर्वाह भागवत आहेत.

करवंदाच्या जाळ्या वणव्यात होरपळल्या

उन्हाळ्यात गारवा देणाऱ्या डोंगरच्या काळ्या मैनेला यंदाही उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. डोंगराच्या कपारीत असलेल्या करवंदांच्या जाळ्या डोंगरांना लागलेल्या आगीत होरपळून गेल्या आहेत. त्याचा परिणाम करवंदांवर दिसून येत आहे.

Web Title: The taste of the black mane of the mountain is less this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.