Satara News: अपघातानंतर वादावादी, चालकाने घेतले चक्क स्वत:ला पेटवून
By दीपक शिंदे | Updated: June 7, 2023 14:32 IST2023-06-07T14:32:12+5:302023-06-07T14:32:34+5:30
जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Satara News: अपघातानंतर वादावादी, चालकाने घेतले चक्क स्वत:ला पेटवून
सातारा : अपघातानंतर झालेल्या वादावादीनंतर टेम्पो चालकाने चक्क स्वत: पेटवून घेतले. ही खळबळजनक घटना वाढे फाटा परिसरात दुपारी घडली. जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या कारची आणि आयशर टेम्पोचा अपघात झाला. या अपघातानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. यामुळे रागाच्या भरात टेम्पो चालकाने स्वत: पेटवून घेतले.
या प्रकारानंतर इतर नागरिकांनी तेथे धाव घेऊन संबंधित चालकाला वाचवले. यामध्ये चालक किरकोळ भाजून जखमी झाला. या घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.