आशियाई महामार्गावर बर्निंग बसचा थरार, सातारा जवळ आनेवाडी येथे महामंडळाची विठाई बस जळून खाक
By दीपक शिंदे | Published: June 12, 2023 03:52 PM2023-06-12T15:52:53+5:302023-06-12T15:53:05+5:30
सातारा- पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर आनेवाडी गावच्या जवळ असणाऱ्या उड्डाणं पुलावर महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने अवघ्या २० मिनिटात ...
सातारा- पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर आनेवाडी गावच्या जवळ असणाऱ्या उड्डाणं पुलावर महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने अवघ्या २० मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली. सूदैवाने चालक वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी बस मधून सुखरूप उतरल्याने जिवीत हानी झाली नाही. सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.
राधानगरी-कोल्हापूर वरून स्वारगेटकडे निघालेली विठाई बस क्रमांक एम एच १३ ८४१३ क्रमांकांची बस पुणे बंगलूर आशियाई महामार्गावरून येत असताना येथील आनेवाडी टोल नाक्याच्या अगोदर असणाऱ्या आनेवाडीच्या उड्डाण पुलावर बसच्या इंजिन मधून धूर येऊ लागल्याचे चालक सागर चौगुले यांना दिसले. क्षणात त्यांनी बस थांबवून वाहक सोनल चौगुले यांच्यासह सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले,काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. महामार्गावर यावेळी धुळीचे लोट पहाव्यास मिळाले. बस मध्ये यावेळी चाळीसहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.
संपूर्ण बस जळून खाक झाल्या नंतर सातारा नगरपरिषदेचा अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी भुईंज पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविली होती. आनेवाडी टोल नाका येथे अग्निशमक बंब कायम स्वरूपी असावा अशी मागणी करण्यात येत आहे.