ट्रकचं नदीत डोकं कोसळलं, पुलावर राहिलं शरीर; वाढे फाट्यावरील घटना
By दत्ता यादव | Published: May 3, 2023 02:04 PM2023-05-03T14:04:10+5:302023-05-03T14:16:36+5:30
चालकाला डुलकी लागल्याने अपघात
सातारा : कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या ट्रक चालकाला डुलकी लागल्याने ट्रक नदीत कोसळता कोसळता बालम बाल बचावला. मात्र, ट्रकचं डोक नदीत कोसळलं तर शरीर पुलावरच राहिलं. हा विचित्र अपघात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास वाढे फाट्यावरील वेण्णा पुलावर झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरहून नारळ घेऊन ट्रक पुण्याला निघाला होता. वाढे फाट्यावरील वेण्णा पुलावर आल्यानंतर चालकाला डोळा लागला. त्यामुळे पुलाचा कठडा ताेडून संपूर्ण ट्रक नदीत कोसळणार इतक्यात ट्रकचा पाठीमागील भाग पुलाला अडकला आणि पुढील भाग नदीत कोसळला मात्र, उर्वरित ट्रकची बाॅडी पुलावरच राहिली. ट्रकच्या केबीनमध्ये ट्रकचालक होता. हे केबीन नदीत कोसळल्याने ट्रकचालक आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
सातारा : कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या ट्रक चालकाला डुलकी लागल्याने ट्रक नदीत कोसळता कोसळता बालम बाल बचावला. मात्र, ट्रकचं डोक नदीत कोसळलं तर शरीर पुलावरच राहिलं. हा विचित्र अपघात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास वाढे फाट्यावरील वेण्णा पुलावर झाला. pic.twitter.com/1nXFfewaXE
— Lokmat (@lokmat) May 3, 2023
या अपघातानंतर संपूर्ण पुलावर नारळ विखुरले गेले. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी ट्रकचालक आणि अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांचीही ओळख पटली नसून, सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.