करून जातंय गाव... कंपन्यांवर येतंय नाव!
By प्रगती पाटील | Published: August 24, 2023 01:29 PM2023-08-24T13:29:40+5:302023-08-24T13:30:07+5:30
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : एमआयडीसीच्या रस्त्यावरील घाणीने परिसरात दुर्गंधी!
- प्रगती जाधव पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नवीन एमआयडीसी मधील अनेक कंपन्या आपला माल निर्यात करत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये येथे परदेशी पाहुण्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. पण कंपनीच्या मार्गावरून जाताना रस्त्यावर आणि शेजारी असणाऱ्या कचऱ्याचे ओंघळ दर्शनाने आता सर्वच त्रस्त झाले आहेत. या रस्त्याने प्रवास करणाऱ्याकडून टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्याचे खापर कंपनीच्या नावावर फुटत आहे. कोडोली ग्रामपंचायतीने लेखी फलक लावून दंडात्मक कारवाई केल्यानंतरही हे प्रकार थांबत नसल्याने तेही हतबल झाले आहेत.
नवीन एमआयडीसी परिसर विस्तीर्ण असून कोडोलीसह देगाव ग्रामपंचायतीचे ग्रामस्थही या रस्त्याचा नियमित वापर करतात. नियमित घंटागाडी सुरू असली तरीही घरातून बाहेर पडता पडता कचऱ्याच्या पिशव्या भिरकविण्याची लागलेल्या सवयीने एका शेतकऱ्याचा बांध अक्षरश: घाणीनेच व्यापून गेला. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या शेतकऱ्यायाने त्याच्या बांधावरचा कचरा चक्क रस्त्यावर विस्कटून टाकल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले. यातून मार्ग काढणं वाहनचालकांना अवघड झाले, याचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.