Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या !
By नितीन काळेल | Published: September 23, 2024 07:13 PM2024-09-23T19:13:16+5:302024-09-23T19:14:46+5:30
उद्धवसेनेच्या नेतृत्वात महिला आक्रमक : दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन
सातारा : सातारा तालुक्यातील रेवंडेत आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. लोकांना पाणी मिळत नाही, असा आरोप करत गावातील महिलांनी उद्धवसेनेच्या नेतृत्वाखाली सातारा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. यावेळी पाण्यावरून महिला आक्रमक झाल्या. यादरम्यान, योजनेची दुरुस्ती करुन दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रेवंडे गावात आठ महिन्यांपूर्वी पेयजल योजना झाली. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे याबाबत महिलांनी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना माहिती दिली होती. त्यानंतर मोहिते हे रेवंडे गावात गेले. तेथे पाणी योजनेची वस्तुस्थिती पाहिली. त्यानंतर सोमवारी सकाळी महिलांसह शिवसैनिक सातारा पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आले. यावेळी शिवसैनिक आणि महिलांनी आक्रमकपणे पाणी योजनेचा विषय मांडला. तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच उद्धवसेना आणि महिलांनीही आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, विनायक भोसले, वैशाली भोसले, शोभा भोसले, नंदा भोसले, अनुसया भोसले, विजया भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.