लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:45 IST2024-11-18T18:45:08+5:302024-11-18T18:45:31+5:30
सातारा : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या ...

लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यातील घटना
सातारा : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १६ रोजी रात्री नऊ वाजता घडली.
सचिन सावंत हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी स्थळ बघणे सुरू होते. मात्र, त्याचे लग्न काही ठरत नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात हाेता. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घरातले देवदर्शनाला गेले होते. त्यावेळी सचिन याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पावणेदहा वाजता घरातले परत आले असता त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली नाही. सचिन याने आत्महत्या का केली, याचे कारण त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांना सांगितले. याबाबत हणमंत धोंडिराम सावंत (वय ४३, रा. मुळीकवाडी, ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. हवालदार राऊत हे अधिक तपास करीत आहेत.