Satara: लॉजवर नेताना रंगेहाथ सापडला, मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला

By दत्ता यादव | Published: December 7, 2023 07:22 PM2023-12-07T19:22:18+5:302023-12-07T19:22:45+5:30

पब्जी खेळत असताना दोघांची झाली ओळख, उत्तर प्रदेशहून भेटण्यासाठी साताऱ्यात आला

The young man was beaten up by his relatives when he left for his girlfriend's lodging in satara | Satara: लॉजवर नेताना रंगेहाथ सापडला, मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला

Satara: लॉजवर नेताना रंगेहाथ सापडला, मैत्रिणीच्या नातेवाइकांनी तरुणाला धू-धू धुतला

सातारा : घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे तर कारमध्ये घालून कास पठारावरही नेलं. या ठिकाणी एका शेतात पालथं झोपवून त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तरुणीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी १९ वर्षांची असून, तिचा मित्र उवैश नसीम अंसारी (वय २०) हा उत्तर प्रदेशमध्ये राहतो. पब्जी खेळत असताना दोघांची ओळख झाली. सोमवार, दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता पीडित तरुणी आणि उवैश हा सातारा शहरातील एका लॉजवर निघाले होते. तरुणीच्या घरातल्यांना तिची शंका आल्याने त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तिचा पाठलाग करत तिचा चुलत भाऊ, दोन काका लाॅजपर्यंत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिचा मित्र उवैश हा लाॅजमध्ये निघाले होते. तत्पूर्वीच घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. तिच्या मित्राला त्यांनी बेदम मारहाण केली. 

त्यानंतर कारमध्ये घालून कास पठार परिसरात नेले. या ठिकाणी रस्त्याच्याकडेला गाडी उभी करून उवैशला एका शेतात नेले. या ठिकाणी त्याला पालथे झोपवून त्याच्या पाठीवर, पायावर बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर त्याला घेऊन संबंधित नातेवाईक सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. त्या तरुणीच्या फिर्यादीनुसार उवैशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, नातेवाइकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या उवैशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ, लहान व मोठे काका यांच्यासह अनोळखी दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सध्या उवैश अंसारी हा पोलिसांच्या कोठडीत आहे.

उवैश घेतोय अभियांत्रिकीचे शिक्षण..

उवैश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. उत्तर प्रदेशहून तो तरुणीला भेटण्यासाठी साताऱ्यात आला होता. मात्र, तरुणीच्या घरातल्यांनी त्याला पकडल्याने तो सध्या जेलची हवा खात आहे. त्याच्या आई-वडिलांनाही या प्रकाराची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. परंतु अद्यापही कोणी आले नाही.

Web Title: The young man was beaten up by his relatives when he left for his girlfriend's lodging in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.