Satara: हळदी समारंभात चोरी; लाखाचा ऐवज लंपास 

By नितीन काळेल | Published: December 22, 2023 06:07 PM2023-12-22T18:07:22+5:302023-12-22T18:07:37+5:30

सातारा : सातारा शहराजवळील कोडोलीतील एका रिसॉर्टमध्ये हळदी समारंभादरम्यान चोरी झाली. यामध्ये रोख रक्कम आणि दागिने असा एकूण एक ...

Theft at the Turmeric Ceremony; Lampas instead of lakhs in satara | Satara: हळदी समारंभात चोरी; लाखाचा ऐवज लंपास 

Satara: हळदी समारंभात चोरी; लाखाचा ऐवज लंपास 

सातारा : सातारा शहराजवळील कोडोलीतील एका रिसॉर्टमध्ये हळदी समारंभादरम्यान चोरी झाली. यामध्ये रोख रक्कम आणि दागिने असा एकूण एक लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सवीता दिलीप साठे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. कोडोलीतील एका रिसॉर्टमध्ये हळदी समारंभाचा कार्यक्रम होता. त्यावेळी अज्ञाताने ६० हजार रुपयांची रोख रक्कम, चांदीचे दोन करंडे, एक चांदीचा छल्ला, चांदीचे दोन कमळ, एक मोबाइल, अडीच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा असा ऐवज चोरुन नेला. याची किंमत एक लाख रुपये आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार भोंडवे हे चोरट्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Theft at the Turmeric Ceremony; Lampas instead of lakhs in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.