स्वराज कारखान्यात चोरी; एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:34+5:302021-03-13T05:11:34+5:30
फलटण : स्वराज इंडिया ॲग्रो साखर कारखाना उपळवे (ता. फलटण) येथून सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य ...
फलटण : स्वराज इंडिया ॲग्रो साखर कारखाना उपळवे (ता. फलटण) येथून सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार, दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी उपळवे, (ता. फलटण) येथील स्वराज इंडिया ॲग्रो साखर कारखाना स्टोअर रूममधून संशयित विक्रम गणेश जगदाळे (रा. सावंतवाडी, ता. फलटण) याने गनमेटल बुश, ब्रास, लाइनर असे ३ लाख १४ हजार ५२ रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार अनिलकुमार पांडुरंग तावरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख अधिक तपास करीत आहेत.