सासवड परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:44+5:302021-05-24T04:37:44+5:30
आदर्की : फलटण पश्चिम भागात सासवड, आदर्की, वाघोशी येथे घरफोड्यांत वाढ झाली आहे. कोरोना काळात सर्व व्यवसाय बंद आहेत, ...
आदर्की : फलटण पश्चिम भागात सासवड, आदर्की, वाघोशी येथे घरफोड्यांत वाढ झाली आहे. कोरोना काळात सर्व व्यवसाय बंद आहेत, त्यातच घरात वडिलोपार्जित चार दागिने बाकी उरलेत त्यावरही चोरटे डल्ला मारत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
फलटण पश्चिम भागाचे सर्व व्यवहार फलटण तालुक्याशी असून, महसूल, कृषी, बँकिंग, सहकार, वीज, न्यायव्यवस्था आदी विभाग जोडले आहेत. परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदर्की परिसरातील पंधरा गावे लोणंद पोलीस स्थानकाला जोडली आहेत. त्यावरचा वाढता ताण लक्षात घेता, तीस वर्षांपूर्वी आदर्की बुद्रुक दूरक्षेत्र पोलीस चौकीची निर्मिती झाली. पण सुविधा दिल्या नाहीत. याठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्याचा फायदा चोरटे घेत असून, आदर्की बुद्रुक, सासवड, वाघोशी येथे घरफोड्या झाल्या तर सासवड परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले. गावाबरोबर वाडी-वस्तीवर छोट्या-मोठ्या चोऱ्या होत असल्याने त्यांचा तपास करुन बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.