धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी

By नितीन काळेल | Published: July 16, 2023 06:57 PM2023-07-16T18:57:36+5:302023-07-16T18:57:49+5:30

सातारा जिल्ह्यात यंदा पश्चिम भागातच पावसाने हजेरी लावल्याने आणि पूर्वेकडे कायम प्रतीक्षा असल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झालेला आहे.

There is no water in the dam Sowing disrupted due to lack of rain; 28 tmc stocks low in coin | धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी

धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात यंदा पश्चिम भागातच पावसाने हजेरी लावल्याने आणि पूर्वेकडे कायम प्रतीक्षा असल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झालेला आहे. आतापर्यंत फक्त ३५ टक्केच पेरणी झाली आहे. तर मागीलवर्षी जुलैअखेरपर्यंत ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. तसेच ३ लाख हेक्टरवर पीक होते. त्याचबरोबर यंदा धरणातही पाणीसाठा अपुरा आहे. कोयना धरणात तर गतवर्षीपेक्षा २८ टीएमसी साठा कमी आहे.

जिल्ह्यात उन्हाळी पाऊस पडल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा मात्र, वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली. तसेच मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. पाऊस सुरू होऊन आता तीन आठवडे होत आलेतरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. पश्चिम भागातच पाऊस पडल्याने भात लागण आणि पेरणी काही प्रमाणात झाली. मात्र, पूर्व भाग दुष्काळी असून या तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या जवळपास एक लाख हेक्टरवरच पेरणी आहे. १२ जुलैच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार भाताची लागण १२ हजार ४०० हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ५ हजार हेक्टरवर तर मकेची ४ हजार २०० हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ४४ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ६० आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १०० टक्के क्षेत्रावर होऊ शकते असा अंदाज आहे. तर भुईमुगाची १५ हजार हेक्टर म्हणजे ५० टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

बाजरीची ७ हजार हेक्टरवरच पेर...
खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी हेच प्रमुख पीक होते. पण, आता सोयाबीनचे क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी बाजरीची ६० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज होता. पण, आतापर्यंत ७ हजार हेक्टरवर पेर झाली. याचे प्रमाण फक़्त ११ टक्के आहे. त्यातच बाजरी प्रामुख्याने माण तालुक्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर घेण्याचा अंदाज होता. पण, अद्यापही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी यापुढे बाजरी पेरणीचे धाडस करणार नाहीत.

पाटणमध्येच ६१ टक्के पेरणी...
पाटण तालुक्यातच ६१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. या तालुक्यात २८ हजार हेक्टरवर भात लागण आणि पेर आहे. तर सातारा तालुक्यात १३ हजार ४२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. पेरणीचे प्रमाण ४२ टक्के आहे. कऱ्हाड तालुक्याचे क्षेत्र ३८ हजार ५७७ हेक्टर असून ४३ टक्के पेर आहे. कोरेगाव तालुक्यात ७ हजार ८२६ हेक्टरवर पेरणी असून टक्केवारी ३७ च्या वर आहे. खटाव तालुक्यात जवळपास ४६ हजार हेक्टर क्षेत्र असून १२ टक्केच पेरणी झाली. माण तालुक्यात ३९ हजार ६०६ हेक्टरपैकी साडे नऊ हजार हेक्टरवर बाजरीसह इतर पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्यात ३ हजार ३१० हेक्टरवर, खंडाळ्यात १७ टक्के, वाई तालुक्यात २१ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
 
धरणांत कमी पाणीसाठा
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत असलातरी अजूनही म्हणावा असा जोर नाही. त्यामुळे बहुतांशी धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोयना धरणात सध्या २५ टीएमसी पाणीसाठा आहे. पण, गतवर्षी तो ५३ टीएमसी होता. म्हणजे कोयनेतच गतवर्षीपेक्षा २८ टीएमसी साठा कमी आहे. तसेच धोम, कण्हेर, येरळवाडी आणि उरमोडी धरणातही कमी पाणीसाठा आहे.
 

Web Title: There is no water in the dam Sowing disrupted due to lack of rain; 28 tmc stocks low in coin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.