पुसेगावच्या विकासासाठी मतदारसंघाची मर्यादा नाही

By Admin | Published: December 26, 2014 11:28 PM2014-12-26T23:28:22+5:302014-12-26T23:49:10+5:30

जयकुमार गोरे : सेवागिरी महाराज यात्रेची सांगता; बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात

There is no limit to the constituency development for Pusgaon | पुसेगावच्या विकासासाठी मतदारसंघाची मर्यादा नाही

पुसेगावच्या विकासासाठी मतदारसंघाची मर्यादा नाही

googlenewsNext

पुसेगाव : ‘मतदारसंघाच्या मर्यादा घालून घेणारा आमदार मी नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सवोगिरी देवस्थानच्या विकासासाठी हा जयकुमार गोरे कधीही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही खटाव-माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
पुसेगाव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि. १६ ते दि. २६ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सांगता बक्षीसवितरण समारंभाने झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, सरपंच मंगल जाधव, मानाजी घाडगे, किरण बर्गे, पोपटराव बिटले, संतोष जाधव, गुलाबराव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, बाळासाहेब जाधव, विशाल बागल, सोमनाथ भोसले उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेची व्याप्ती पाहता भविष्यात यात्रा भरविण्यासाठी जागेची उपलब्धता असणे गरजेचे होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टला ९.७६ हेक्टर हक्काची जागा मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भविष्यात गावची रचना बदलली तरी यात्रा भरण्यास कधीही अडचण निर्माण होणार नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून श्री सेवागिरी देवस्थानच्या विकासासाठी सुमारे तीन कोटींचा निधी मिळाला असून, अनेक कामे मार्गी लागली आहेत. भविष्यातही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ट्रस्टला यात्रेच्या नियोजनासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. देवस्थानचा प्रश्न हा स्वत:चाच समजून काम मार्गी लागेपर्यंत त्याचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
मठाधिपती सुंदरगिरी महाराज म्हणाले, ‘श्री सेवागिरी महाराजांचा महिमा अगाध असून, त्यांच्या भाविक, भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या बाबतीत ट्रस्ट नेहमीच अग्रेसर भूमिका घेणार आहे.’
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘श्री सेवागिरी महाराजांच्या यात्राकाळात जिल्हाधिकारी व सर्व संबंधित शासकीय व निमशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने यात्रेतील सर्व नियोजित कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात कुठेही अडथळा आला नाही. भाविक, भक्तांना अधिकाधिक सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी पालकमंत्री, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करत कामे मार्गी लावली आहेत. आगामी काळात भाविक, भक्तांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध राहणार आहे. (वार्ताहर)


इंदापूर, खटावच्या खोडांना मान
श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे आयोजित केलेल्या जातिवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनात सर्जेराव एकनाथ वाघमोडे (रा. काढी, ता. इंदापूर ) यांच्या चारदाती व उत्तम मानसिंग फडतरे (रा. फडतरवाडी, ता. खटाव) यांच्या दोन दाती खोंडाना विभागून ‘सेवागिरी चॅम्पियन’चा किताब देण्यात आला. आनंदा ज्ञानदेव सरोदे (रा. महुद, ता. सांगोला) यांच्या एक वर्षावरील कालवडीने गायीमध्ये ‘चॅम्पियन’चा पदाचा बहुमान मिळविला. पशुसंवर्धनचे डॉ. शेख, डॉ. वाघमोडे, डॉ. मोरकाने, डॉ. भिसे, डॉ. शाम कदम, डॉ. इंगवले, डॉ. डी. पी. लोखंडे, जीवन जाधव, विलासराव जाधव, बाळासो जाधव, मोहनराव जाधव, संदीप जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी जातिवंत खिलार जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

Web Title: There is no limit to the constituency development for Pusgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.