आनेवाडी टोलनाक्यावर कदापिही मॉल नाही!

By admin | Published: May 29, 2015 09:58 PM2015-05-29T21:58:45+5:302015-05-29T23:45:36+5:30

जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन

There is no mall on Agrawal TolaNak! | आनेवाडी टोलनाक्यावर कदापिही मॉल नाही!

आनेवाडी टोलनाक्यावर कदापिही मॉल नाही!

Next

मुदगल : पुणे-बंगळूर महामार्गावरील कामांबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करा
सातारा : राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे कामकाज जलद गतीने पुर्ण करावे, असे आदेश देत आनेवाडी व विरमाडे येथील जमीन मॉल साठी नव्हे तर फक्त टोलनाक्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच आवश्यक असेल तेवढी संपादीत करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाबाबत उड्डाण पुलांवरील चालू असलेल्या व बंद असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीस राजेश कुंडल (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग पुणे), भूसंपादन समन्वयचे उपजिल्हाधिकारीे अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे, वाईचे प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री शिवणकर, माजी आमदार मदन भोसले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या उड्डाण पुलाचे काम चालू आहे ते जून २०१५ पूर्वी पूर्ण करुन वाहतूकीसाठी सुरु करावेत. तसेच ज्या उड्डाण पुलाची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत अशी कामे तात्काळ सुरु करावीत. महामार्गाच्या सहापदरीच्या ठिकाणी दिशादर्शक किंवा वाहतूकीचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
आनेवाडी व विरमाडे येथील टोल नाक्यासाठी जमीन संपादनाबाबत, मॉलसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात येणार आहे अशी अफवा पसरल्याने त्याठिकाणी जमीन संपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणांत विरोध आहे. ती जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन करण्यात येणार आहे.
पुवीर्ची मोजणी आलेली रद्द करुन दुरुस्त मोजणी नकाशा सादर करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले, आनेवाडीमधील ० हेक्टर ६२ आर आणि विरमाडेमधील एक हेक्टर १२ आर ऐवढी जमीन संपादीत करावी. विरमाडे मधील स्थानिक
शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन झालेला गैरसमज दुर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी रविंद्र खेबूडकर यांना दिल्या. (प्रतिनिधी)

उड्डाणपुलाबाबत प्रस्ताव सादर करा
पाचवड येथे किसनवीर सहकारी साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांकडे २५ ते ३० गांवे असल्याने पाचवड येथे उड्डाणपुल व्हावे, अशी विनंती माजी आमदार मदन भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत पोलिस यंत्रणा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वाहतूक व सदर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांबाबतचा सर्व्हे करुन पाचवड या ठिकाणी उड्डाण पुला बाबत संयुक्तीक अहवाल सादर कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: There is no mall on Agrawal TolaNak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.