पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

By admin | Published: May 17, 2017 11:13 PM2017-05-17T23:13:29+5:302017-05-17T23:13:29+5:30

पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

There is no need to stop drinking water | पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : ‘नीरा-देवघर धरणाचे पाणी यापूर्वीच वीर धरणात सोडले गेले आहे. वीर धरणाच्या कालव्याद्वारे ते केवळ बारामतीला पळवले जात आहे. आठ दिवसांपूर्वी नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत आणल्याचा डांगोरा पिटला गेला. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोडले गेले होते. वास्तविक, नीरा-देवघरच्या पाण्याची आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर करू शकत नाहीत. कारण, हे पाणी ज्यांना चाललंय त्यांना अडविण्याची हिंमत यांच्यात नाही,’ असा घणाघात जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड . बाळासाहेब बागवान यांनी केला.
खंडाळा येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘रामराजेंनी पाण्याबाबत खंडाळकरांचा विश्वासघात केला आहे. नीरा-देवघरचे पाणी तातडीने खंडाळा तालुक्यातील शेतीसाठी सोडावे अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘नीरा-देवघरचे पाणी मार्च २०१६ पर्यंत कामे पूर्ण करून पोहोचवावे, असा न्यायालयाचा आदेश राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाणी देणे बंधनकारक असल्याने पाणी सोडण्यात आले.
मात्र, त्यात पाणी पूजनासाठी श्रेयवाद उफाळला. आमदारांनी पाणी पूजन केले तेव्हा तर कालव्याचे पाणीही बंद झाले होते. वाजतगाजत पाणी आल्याचा डांगोरा पिटून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे.’ यामुळे खरच शेतीला पाणी मिळाले का? याचा विचार करणे गरजेचे आहे. पाणी आणलं म्हणता मग चालू का ठेवले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर आमदार हे श्रेय घेण्यासाठीच पाणी पूजनाला आले होते, अशी टीका शामराव धायगुडे यांनी केली.
सध्या खंडाळा तालुक्यात शेतीला पाणी नाही. जनावरांना
आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई अनेक गावांतून आहे. असे
असताना न्यायालयात पाण्यासाठी आमचे प्रयत्न पूर्ण ताकदीने सुरू
आहेत हे दाखविण्यासाठी केलेलं नाटक आहे. त्यामुळे जनतेने सावध राहावे.
नीरा-देवघर प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना आणण्यासाठी रामराजेच मुराळी होते. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा पुरविताना त्यावेळी जलसंपदा मंत्री असतानाही वाऱ्यावर सोडले. पुनर्वसित लोकांच्या जमिनींना पाणी देण्याची जबाबदारी सरकारची नाही, असेही यांनीच स्पष्ट केल्याचे सांगितले.
नीरा-देवघरचे एक टीएमसी पाणी उपसा करून धोम-बलकवडी कालव्याद्वारे फलटण माळशिरसला नेण्याचा घाट सरकार दरबारी घातला जात आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील जनतेची फसवणूक केली जात असल्याचे सांगून नीरा-देवघरचे पाणी सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. पाणी न मिळाल्यास मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस माजी सभापती एस. वाय. पवार, शामराव धायगुडे, अशोक डोईफोडे उपस्थित होते.

Web Title: There is no need to stop drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.