महाबळेश्वरमध्ये निपाह विषाणूच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:15+5:302021-06-29T04:26:15+5:30
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या जंगलातील राॅबर्स केव्ह गुहेमधील दोन वटवाघळांमध्ये निपाहचे विषाणू सापडल्याचा दावा करून राज्यात खळबळ उडवून दिली ...
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या जंगलातील राॅबर्स केव्ह गुहेमधील दोन वटवाघळांमध्ये निपाहचे विषाणू सापडल्याचा दावा करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. पुणे येथील एनआयव्ही संस्थेच्या संशोधकांनी तसा अहवालही दिला होता. महाबळेश्वरच्या जंगलातील वटवाघळामध्ये निपाहसारखा विषाणू आढूळन आला नाही. मात्र, याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे,’ असे मत संशोधक महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वरच्या जंगलातील राॅबर्स केव्ह या गुहेची पाहणी करून हिरडा विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. रॉबर्स केव्ह गुहा बेसाॅल्ट या खडकापासून तयार झाला आहे. यात साधारण एक किलोमीटर लांब आहे. १९३६ मध्ये ‘ब्रेसेट’ या संशोधकाने या ठिकाणी संशोधन केले होते. त्या वेळी दोन वटवाघळांच्या जाती येथे होत्या. सध्या या ठिकाणी सहा जातींची वटवाघळे येथे आहेत. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू सापडतात, या विषाणूचा वटवाघळांना काहीच त्रास होत नाही, कारण की वटवाघळे जेव्हा उड्डाण करतात तेव्हा त्यांचे तपमान हे ४० डिग्रीपर्यंत जाते, या उष्णतेमुळे विषाणू हे मरून जातात. त्यामुळे ते इतरांमध्ये संक्रमित होत नाही जर एखादे वटवाघळ दोन ते तीन दिवस एकाच जागेवर राहिले तर त्यांच्यामधील विषाणूचा परिणाम त्यांच्यावर होऊन ते मृत्युमुखी पडतात म्हणून या गुहेजवळ कोणी जाऊ नये व या परिसरातील उष्टी फळे कोणी खाऊ नये, असे आवाहनही संशोधक महेश गायकवाड यांनी केले आहे.