शासकीय केंद्रात १८ वर्षांपुढील लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:57+5:302021-04-29T04:30:57+5:30

सातारा : जिल्ह्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पण, पुढील आदेश येईपर्यंत ...

There is no vaccination before the age of 18 in government centers | शासकीय केंद्रात १८ वर्षांपुढील लसीकरण नाही

शासकीय केंद्रात १८ वर्षांपुढील लसीकरण नाही

Next

सातारा : जिल्ह्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पण, पुढील आदेश येईपर्यंत शासकीय केंद्रावर लसीकरण होणार नाही. खासगी रुग्णालयात शुल्क देऊन होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सातारा जिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. आता १ मे पासून जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, सद्यस्थितीत संबंधित लाभार्थिंचे लसीकरण खासगी रुग्णालयात शुल्क देऊन होणार आहे. त्यासाठी लाभार्थिंनी लिंकवर नोंदणी करावी. त्यानंतर लाभार्थिंना लसीकरण तारीख आणि वेळ उपलब्ध होईल.

त्याचबरोबर सद्यस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे लाभार्थिंनी शासकीय केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

......................................................

Web Title: There is no vaccination before the age of 18 in government centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.