प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 02:25 PM2021-12-15T14:25:45+5:302021-12-15T14:26:15+5:30

प्रेयसीने दगा दिला, तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो.

There was an increase in the incidence of attacks from love affairs | प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव

प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव

Next

सातारा : एका टप्प्यावर जीव ओवाळून टाकणारे प्रेम दुसऱ्या टप्प्यावर एकमेकांना उद्ध्वस्त करण्याचा अतिरेक करत आहे. गेल्या काही वर्षांपासून घडलेल्या घटनांमधून समाजमन अस्वस्थ झाले आहे. त्याच्यामुळे हे प्रेम की आणखी काही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आधी ओळख नंतर मैत्री तासन् तास चॅटिंग आणि त्यानंतर जिना मरना संग संगच्या आणाभाका घेणारे प्रेमवीर. पहिल्या टप्प्यात एक दुसऱ्यासाठी काहीही करायला तयार होतात. विरोध करणाऱ्या रक्ताच्या नातेवाइकांना शत्रू समजतात. या स्थितीत त्यांचा मुक्त वावर सुरू असतो. धमाल-मस्ती, फिरणे खाणे अन् गाण्यासोबतच बेभान होऊन ते सर्व मर्यादा ओलांडतात. पती-पत्नी सारखे एकमेकावर हक्क दाखवतात. विशिष्ट कालावधीनंतर मात्र त्यांच्यातील प्रेम ओसरू लागते. तिला दुसरा चांगला किंवा त्याला दुसरी चांगली मिळाली की पहिल्या साथीदाराला टाळणे सुरू होते.

दुसऱ्याशी भेटीगाठी वाढल्याचा संशय आल्याने ती किंवा तो पेटून उठतो. नंतर सुरू होतो लग्नासाठी तगादा आणि आता तगाद्यातच दडली असते तिच्या किंवा त्याच्याबद्दलची सूडभावना. कथित प्रेमाचा उद्रेक होतो. दगाबाजी करणाऱ्या प्रियकाराविरुद्ध ती पोलिसांकडे धाव घेते. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावते. त्याच्या दगाबाजीची शिक्षा ती त्याला कौटुंबिक सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या रूपाने देते. त्याची बाजूही अशीच भयावह आहे.

प्रेयसीने दगा दिला, तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो. जालीम जमान्यापासून तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आटापिटा करणारा प्रियकर या वळणावर चक्क तिला संपवून टाकण्याचा प्रयत्न करतो. सातारा जिल्ह्यामध्ये दगाबाजीनंतर कथित प्रेम प्रकरणाने घेतलेले जीव ते वळण समाजमन अस्वस्थ करणारे ठरले आहे.

प्रियसीने प्रियकराला विरुद्ध बलात्काराचा आरोप लावून त्याला उद्ध्वस्त करण्याचे महिनाभरात तीन तर हत्येच्या दोन घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील कथित पीडित आणि आरोपींमध्ये महाविद्यालयीन युवक तर कोणी नोकरदार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून पुढे आलेले हे वास्तव आहे.

जिल्ह्यातील या दोन घटना आहेत उदाहरण

पाटण तालुक्यातील चाफळ येथे काही महिन्यांपूर्वी भरदिवसा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातून प्रियकराने भरदिवसा गळा चिरून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिकेत मोरे (वय २२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) याला अटक केली होती. दरम्यान अशाच प्रकारे कराड येथील विवाहितेची तिच्या मेव्हण्याने प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे समोर आले होते.

बदनामीचे षडयंत्र...

प्रेमसंबंधातून प्रारंभी लग्नाचा वादा करणाऱ्या प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिचे दुसरे लग्न ठरले. मात्र, हतबल झालेल्या प्रियकर आणि तिची सोशल मीडियावर बदनामी केली. त्यामुळे ठरलेले लग्न तिचे मोडले. शिवाय तिच्या प्रियकराला ही कारागृहाची हवा खावी लागली.

Web Title: There was an increase in the incidence of attacks from love affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.