प्लास्टिकच्या घाणीने पाणी होतेय दुषित

By admin | Published: June 24, 2017 01:49 PM2017-06-24T13:49:13+5:302017-06-24T13:49:13+5:30

वांग नदी पात्र : पुलावरून पिशव्यांची गच्छंती

There is water contaminated by plastic waste | प्लास्टिकच्या घाणीने पाणी होतेय दुषित

प्लास्टिकच्या घाणीने पाणी होतेय दुषित

Next

आॅनलाईन लोकमत

पाटण , दि. २४ : कऱ्हाड ढेबेवाडी रस्त्यावर वांग नदीचा पूल असून या पुलावरूनच नदीपात्रात कचरा टाकत असल्यामुळे नदीपात्रात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. परिणामी विविध गावांच्या नळपाणी पुरवठ्याच्या विहीरी नदीकाठावर असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ढेबेवाडी परिसरात झपाट्याने नागरिकरण वाढू लागले आहे. परिसरातील अन्य गावातील लोक याठिकाणी स्थायिक झाले आहेत. वाढत्या लोकवस्तीबरोबरचं येथे कचऱ्याची समस्याही वाढली आहे. मंद्रुळकोळे आणि ढेबेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा परिसर येतो.

मात्र, ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. ठिकठिकाणी ओढ्याची पात्र कचऱ्याने व्यापली असून हे लोण आता वांग नदीपर्यंत पोहोचले आहे. ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्यावरील पुलाखाली जेथे नदीच्या दोन प्रवाहांचा संगम आहे.

त्याठिकाणी परिसरातील व्यापारी, नागरकि आणि पुलावरून ये जा करणारे प्रवासी कचऱ्याने भरलेल्या पिशव्या आणि पोती टाकत आहेत. त्यामुळे नदीच्या पुलावर दुगंर्धी पसरली आहे. काही नागरिक घरातील कचरा, देवापुढचे निर्माल्य आदी अनेक केर प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणतात. पुलावरून या पिशव्या नदी पात्रात भिरकविण्याचे प्रकार सर्रास पहायला मिळत आहेत.

Web Title: There is water contaminated by plastic waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.