आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर--संताप आणि किरकोळ कारणातून आयुष्य संपवण्याचा मार्ग-- तरूणाईची मानसिकता =आत्महत्येची कारणमीमांसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:16 PM2018-04-20T23:16:13+5:302018-04-20T23:16:13+5:30
सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे.
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे. ‘आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर,’ अगदी अशीच मानसिकता तरुणाईची दिसत आहे.
हातात आलेल्या आधुनिक गॅझेटस्मुळे तरुणाईने दुनिया मुठ्ठीमे केली; पण वास्तविक ही दुनिया त्यांच्या मुठीतून दूर गेल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून त्यांनी ‘कायमची सुटका हवी’ म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे पसंत करत आहेत. स्पर्धेच्या युगात स्वत:शीच लढत राहणाºया या विद्यार्थ्यांचा संवाद कमी झाला आहे. आॅनलाईन विश्वात रमणाºयांना विविध माध्यमातून ‘लाईक’ करणारे अनेकजण आहेत. मात्र, चेहºयावरील हावभाव आणि वर्तन बदलूनही कोणी काय झालं? हे विचारात नाही, याचे शल्य तरुणाईला बोचणारे आहे. कॉलेजमध्ये असलेला एकटेपणा, अभ्यास पेलता येत नसल्याने आलेले नैराश्य हे आत्महत्येची काही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
तरुणाईची सहनशीलता आता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे कुठल्याही कारणाने झालेला विरोध पचवणं त्यांना जड जात आहे. अशात कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी रागाच्या भरात विषप्राशन करणारे बहाद्दरही अनेक आहेत.
महाविद्यालयाची चाहूल लागल्यानंतरच प्रत्येकाला आपली ‘परफेक्ट जोडी’ शोधण्याची उत्सुकता असते. मित्र परिवाराच्या मदतीने पाळत ठेवून एखादी आवडली आणि तिने नकार दिला तर युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. दुसरीकडे महाविद्यालयीन ओळखीचे नको इतक्या जवळचे संबंध प्रस्थापित केलेल्या युवतींना नंतर हे नाते पुढे नेता आले नाही तरीही त्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.
आत्महत्यापूर्वी मिळतो सोशल संकेत
तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेले नैराश्य सोसवतही नाही अन् सांगवतही नाही, असे असते. म्हणूनच कोणीतरी आपल्याला विचारावे, या हेतूने आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाई काही सोशल संकेत देते. व्हॉटस्अॅप अन् फेसबुकच्या दुनियेत वावरणारी तरुणाई स्टेटस आणि डीपी अपडेट करून काही सुचविते. हे सुचविणे जर मित्रांच्या लक्षात आले तर त्यातून आत्महत्या करण्याचा विचार बाहेर जातो; पण दुर्दैवाने मित्रांनीही जर हे गांभीर्याने घेतले नाही तर मात्र या जगाला माझी गरज नाही, म्हणून ही मुलं आत्महत्या करतात. घरी वावरतानाही ही मुलं कमालीची समंजस्य असल्यासारखे वागतात.
ही काही कारणे
प्रेम प्रकरणातील अपयश
प्रेम संबंधातून निर्माण होणारी बदनामीची भीती
वाईट संगतीमुळे अभ्यासाकडे झालेले दुर्लक्ष
महाविद्यालयात मिळणारी द्वेषकारक किंवा कमीपणाची वागणूक
महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गातील मुलांकडून होणारे रॅगिंग
साताºयातील काही उदाहरणे
१. जावळी तालुक्यातील एका तरुणीने घरात रविवारी तिच्या आवडीचे जेवण केले नाही, या कारणाने पडवीत जाऊन औषध पिऊन आत्महत्या केली. याविषयी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती.
. सातारा तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाºया एका युवकाने परीक्षेच्या निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. निकाल लागला तेव्हा हा मुलगा कमी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले होते.