राजेंच्या विरोधकांचे डिपॉजिटही उरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:16 AM2019-02-25T00:16:16+5:302019-02-25T00:16:23+5:30

सातारा : ‘येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी आजपर्यंत निवडणूकच लढविली नाही, ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे ...

There will be no deposit of Raje's opponents | राजेंच्या विरोधकांचे डिपॉजिटही उरणार नाही

राजेंच्या विरोधकांचे डिपॉजिटही उरणार नाही

googlenewsNext

सातारा : ‘येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी आजपर्यंत निवडणूकच लढविली नाही, ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. उदयनराजेंना जो विरोध करेल त्यांचे डिपॉजीटही राहणार नाही. ’ असा टोला कल्पनाराजे भोसले यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे नाव न घेतला लगावला.
सातारा पालिकेच्या वतीने अण्णासाहेब कल्याणी शाळेशेजारी उभारण्यात आलेल्या प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक गार्डनच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, अ‍ॅड. दत्ता बनकर, अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आज प्रत्येकाला ताणतणाव आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सातारकर या गार्डनचा नक्की उपयोग करतीत, असे सांगून कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, ‘साताऱ्याची जनता आमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. जनतेच्या पाठबळावर आम्ही एव्हरेस्टदेखील पार करू शकतो. येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी कधी निवडणूक लढविली नाही ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.राजेंना जे विरोध करतील त्यांच्या मागे जनता माजी लावेल.’
दरम्यान, आयुर्वेदिक गार्डनमधील मड पाथवे, ग्रास अ‍ॅक्युपे्रशर, क्रिस्टर, लेझर शो, कारंजे, गोशाळा, ओपन थिएटर, गार्डनमध्ये लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे आदींचे कल्पनाराजे भोसले यांनी भरभरून कौतुक केले.

Web Title: There will be no deposit of Raje's opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.