Satara: भरदिवसा दुर्गा देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 16:41 IST2023-10-19T16:41:14+5:302023-10-19T16:41:55+5:30
करंजे : सातारा शहरातील करंजे पेठेतील दुर्गा देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लंपास ...

Satara: भरदिवसा दुर्गा देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
करंजे : सातारा शहरातील करंजे पेठेतील दुर्गा देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले. याची किंमत अंदाजे साठ हजार रुपये आहे. विशेष म्हणजे हे मंडळ भरचौकात असून माणसांची नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते. तरीही चोरट्यांनी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत मंगळसूत्र लंपास केले.
देवीची उंची जास्त असल्यामुळे दागिने हाताला येत नाहीत तरीही चोरट्यांनी मंगळसूत्र कसे काय चोरले हाच प्रश्न नागरिक व मंडळातील कार्यकर्त्यांना पडला आहे. फोटो काढत असतात काही नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. बदनामीच्या भितीने मंडळाच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही.