दहिवडीत चोरट्यांची दहशत, घरफोडीकरुन सव्वा लाखाचा ऐवज लंपास; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:35 PM2022-03-31T16:35:48+5:302022-03-31T16:36:25+5:30

दहिवडी परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे.

Thieves terrorize Dahivadi, looted Rs 1 lakh from burglary | दहिवडीत चोरट्यांची दहशत, घरफोडीकरुन सव्वा लाखाचा ऐवज लंपास; पोलिसांसमोर आव्हान

दहिवडीत चोरट्यांची दहशत, घरफोडीकरुन सव्वा लाखाचा ऐवज लंपास; पोलिसांसमोर आव्हान

Next

दहिवडी : दहिवडी परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पाठीमागे एसटी कॉलनी येथे अमजद अल्लाउद्दीन शेख यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत माहिती अशी की, अमजद शेख यांचा चारचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पुतणीचे लग्न जमण्यासाठी ते कुळकजाईए तालुका माण या ठिकाणी गेले होते. घर बंद असल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून रविवारी (दि.२७) मध्यरात्री घराचे कुलूप तोडून सोन्याचे पदक, अंगठी, मंगळसूत्र व इतर सोन्याच्या छोट्या-छोट्या वस्तू आणि रोख रक्कम ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.

चोरीच्या या प्रकाराबाबत त्यांचे वडील यांनी अमजदला फोनवरून सांगितले. याची माहिती मिळताच अमजद शेख यांनी घरी येताच दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Thieves terrorize Dahivadi, looted Rs 1 lakh from burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.