सलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याचा पारा ९.४ अंशावर, शेकोट्या पेटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:38 PM2019-01-01T13:38:28+5:302019-01-01T13:39:42+5:30

सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशावर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे.

On the third day of the third consecutive day, satyarthi mercury burned down on 9.4 degrees | सलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याचा पारा ९.४ अंशावर, शेकोट्या पेटल्या

सलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याचा पारा ९.४ अंशावर, शेकोट्या पेटल्या

googlenewsNext
ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशी साताऱ्याचा पारा ९.४ अंशावर शेकोट्या पेटल्या : किमान तापमान खालावल्याने गारठा कायम 

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका असून गेल्या तीन दिवसांपासून तर किमान तापमान ९.४ अंशावर कायम स्थिर आहे. सततच्या या थंडीमुळे ग्रामीण भागातील गावोगावी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा थंडीला लवकर सुरूवात झाली. दिवाळीच्या सणापासूनच थंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊन १५ नोव्हेंबरच्या सुमारास यावर्षी प्रथमच साताºयातील किमान तापमान १३.४ अंशापर्यंत खाली आले होते. तर ११ डिसेंबरला किमान तापमान कमी होऊन ९.५ अंश नोंदले गेले.

यामुळे एकदमच थंडीची लाट निर्माण झाली. तर यावर्षीचे आतापर्यंतच सर्वात कमी तापमान ९ अंश नोंदले गेले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरुन येत आहे. थंडीची तीव्रता असून थंड वारेही वाहत आहेत. यामुळे वातावरणात एकप्रकारची थंड लहर जाणवत आहे. 

शनिवारी तर किमान तापमान ९.१ अंशावर होते. तर रविवारी ९.४ होते. सोमवार आणि मंगळवारीही साताºयात किमान तापमान ९.४ अंश नोंदले गेले. सतत तापमान १० अंशाच्या आसपास राहिल्याने गारठा वाढला आहे. यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. लोकांना ऊबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, अशी स्थिती आहे.  

Web Title: On the third day of the third consecutive day, satyarthi mercury burned down on 9.4 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.