तिसऱ्या लाटेत लहान मुलेच बाधित होण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:13+5:302021-05-19T04:40:13+5:30

सातारा : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या ...

In the third wave, only children are expected to be affected | तिसऱ्या लाटेत लहान मुलेच बाधित होण्याचा अंदाज

तिसऱ्या लाटेत लहान मुलेच बाधित होण्याचा अंदाज

Next

सातारा : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या अंदाजानुसार लहान मुलांना तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आतापासूनच नियोजन करा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभिराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

१५ ते ४० वयोगटात कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण जास्त आहेत. त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण आणखी वाढविले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय सेवांचे विकेंद्रीकरण करा, तसेच एखाद्या रुग्णामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे, यामुळे गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचनाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आढावा बैठकीत केल्या.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे या बैठकीत दिली.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.

Web Title: In the third wave, only children are expected to be affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.