चाळीस दिवसांत तेराशे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:28+5:302021-04-12T04:36:28+5:30
कऱ्हाड : तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारांवर पोहोचली आहे. फेब्रुवारी अखेरपासून ...
कऱ्हाड : तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला असून आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजारांवर पोहोचली आहे. फेब्रुवारी अखेरपासून संक्रमण वाढले आहे. गत चाळीस दिवसांत तालुक्यात १ हजार ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, वाढत्या संक्रमणाबरोबरच आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यावरही भर दिला आहे. त्याद्वारे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न होत असून लसीकरणालाही तालुक्यात गती आली आहे.
कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नव्याने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही गावांमध्ये रुग्णांची साखळी निर्माण झाली आहे तर काही गावे पुन्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गत महिन्यात तालुक्यातील घारेवाडी गावात एकाचवेळी बाधितांची संख्या वाढली होती. मात्र, सध्या तेथील परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, इतर काही गावांमध्ये धास्ती वाढली आहे.
कोरेगावमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. सध्या त्याठिकाणी १९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याबरोबरच हेळगाव-पाडळी, चचेगाव, मलकापूर, तारूख, कोळे, मसूर, सैदापूर, तळबीड, कार्वेनाका, शेणोली, वडगाव हवेली आणि सवादे या गावांचीही चिंता वाढली आहे. संबंधित गावांवर सध्या आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. इतर गावांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. सध्या आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने चाचणी केली जात आहे. त्याद्वारे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला जात असून बाधितांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन केले जात आहे.
- चौकट
शनिवारी १६० पॉझिटीव्ह
कऱ्हाड शहर : ५४
हेळगाव : ६
इंदोली : २
काले : २०
कोळे : १९
मसूर : ३
सदाशिवगड : ८
सुपने : २
उंब्रज : ४
वडगाव ह. : २८
येवती : १०
(आरोग्य केंद्रनिहाय रुग्ण)
- चौकट
बाधितांचा लेखाजोखा
२८ फेब्रुवारीपर्यंत : ९९६८
१ ते ३१ मार्चदरम्यान : ५७३
१ ते ९ एप्रिलदरम्यान : ६२१
१० एप्रिल रोजी : १६०
आजअखेर एकूण : ११३२२
- चौकट
कोरोना अपडेट
एकूण बाधित : ११३२२
कोरोनामुक्त : १०२७४
दुर्दैवी मृत्यू : ३५५
उपचारात : ६९३
- चौकट
उपचारातील रुग्णांपैकी...
होम आयसोलेट : ३८३
रुग्णालयात : ३१०२
- चौकट
सरासरी
रिकव्हरी रेट : ९१.७० टक्के
पॉझिटिव्ह रेट : १४.४७ टक्के
- चौकट
कऱ्हाड तालुक्यात...
१८५ : बाधित गावे
८४ : कोरोनामुक्त गावे
१०१ : कंटेन्मेंटमध्ये गावे
- कोट
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तालुक्याचा ‘रिकव्हरी रेट’ चांगला असून मृत्यूचे प्रमाण कमी आहे. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. लसीकरणासाठी तातडीने नावनोंदणी करावी. नियमांचे पालन आणि लसीकरण या माध्यमातूनच आपल्याला संक्रमण रोखता येऊ शकते.
- डॉ. संगीता देशमुख
तालुका वैद्यकीय अधिकारी