विहेत तेरा रुग्ण सापडले; गाव सील करण्याचा घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:51+5:302021-03-13T05:12:51+5:30
विहे (ता. पाटण )गावात कोरोनाचे १३ रुग्ण सापडल्यामुळे शासनाने संपूर्ण गाव सील केले. अत्यावश्यक सेवा वगळता २० मार्च अखेर ...
विहे (ता. पाटण )गावात कोरोनाचे १३ रुग्ण सापडल्यामुळे शासनाने संपूर्ण गाव सील केले. अत्यावश्यक सेवा वगळता २० मार्च अखेर संपूर्ण गावातील दुकाने बंद केली. मास्क न वापरणाऱ्या ग्रामस्थास ५०० रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती उपसरपंच अविनाश पाटील यांनी दिली.
गेल्या दोन दिवसात १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आज पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार, पाटण व मल्हारपेठ आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागाची पाहणी केली. संपूर्ण गाव सील करण्याचा निर्णय घेतला. आज ७६ ग्रामस्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. १३ पैकी १ रुग्ण दवाखान्यात असून बाकीचे रुग्ण गावातील समाज मंदिरात व घरात क्वॉरंटाईन केले आहेत. संबंधित वॉर्ड फवारणी करण्यात आला असून गावात मास्क न वापरणाऱ्यास ५०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.