तेरा वर्षांच्या दुचाकीस्वार मुलाने वृद्धेला उडविले, साताऱ्यातील घटना; वडिलांवर होणार गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:21 PM2022-12-18T15:21:27+5:302022-12-18T15:21:32+5:30
लहान मुलाच्या हातात गाडी देणे, हे एका पालकाला चांगलेच भोवणार असून, त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने भरधाव दुचाकी चालवून एका वृद्धेला धडक दिली. यामध्ये संबंधित वृद्धा गंभीर जखमी झाली. हा अपघात साताऱ्यातील पोवर्इनाक्यावर झाला.
सातारा :
लहान मुलाच्या हातात गाडी देणे, हे एका पालकाला चांगलेच भोवणार असून, त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने भरधाव दुचाकी चालवून एका वृद्धेला धडक दिली. यामध्ये संबंधित वृद्धा गंभीर जखमी झाली. हा अपघात साताऱ्यातील पोवर्इनाक्यावर झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवानंद विष्णू भोसले (वय ७२), लता देवानंद भोसले (वय ६७, रा. वसंत नगर मनोहरविश्वअपार्टमेंट खेड, ता. सातारा) हे दाम्पत्य सिव्हिल हाॅस्पीटलशेजारीलरस्ता ओलांडत होते. त्यावेळी पोवर्इ नाक्यावरून दुचाकीवरून भरधाव आलेल्या १३ वर्षाच्या मुलाने लता भोसले यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, लता भोसले या उडून रस्त्यावर पडल्या.
यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. हा अपघात दि. ७ रोजी सकाळी साडेदहा वाजता झाला होता. मात्र, त्या गंभीर जखमी असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला नव्हता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी जबाब नोंदविला. त्यानंतर १३वर्षांच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. परंतु लहान मुलाच्या हातात गाडी देणे हा कायद्याने गुन्हअसल्याने पोलिस संबंधित मुलाच्या पालकांना नोटीस बजावणार असून, त्या पालकावरगुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत हवालदार जयवंत कारळे हे अधिक तपास करीत आहेत.