‘थर्टी फर्स्ट’ला कऱ्हाडात वाहतूक पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:56 AM2021-01-02T04:56:05+5:302021-01-02T04:56:05+5:30
शहरासह तालुक्यात गुरुवारी थर्टी फर्स्टची धूम होती. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेकांनी ओल्या पार्टीसह जेवणाचे बेत आखले होते. यादिवशी मद्य ...
शहरासह तालुक्यात गुरुवारी थर्टी फर्स्टची धूम होती. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेकांनी ओल्या पार्टीसह जेवणाचे बेत आखले होते. यादिवशी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. तसेच वाहतुकीच्या नियमांचेही सर्रास उल्लंघन केले जाते. ही बाब ओळखून कऱ्हाडच्या वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली. गुरुवारी दिवसभर शहरातील महत्त्वाचे चौक तसेच महामार्गावर नांदलापूर येथे वाहनांवर कारवाई करण्यात आली. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रीतसर खटले दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच ट्रीपल सीट प्रवास, विनाहेल्मेट दुचाकी चालविण्यासह लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली. वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची ही मोहीम आखण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
- कोट
विशेष मोहिमेअंतर्गत गुरुवारी दिवसभरात पाचशेपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. महामार्गावर लेन कटिंगसह विनाहेल्मेट आणि विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेत त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- सरोजिनी पाटील, सहायक निरीक्षक
वाहतूक शाखा, कऱ्हाड
- चौकट
कऱ्हाडातील ३१ डिसेंबरची कारवाई
१) मद्य प्राशन : २३
२) विनाहेल्मेट : ३१
३) विना सीटबेल्ट : २०
४) ट्रीपल सीट : २४
५) लेन कटिंग : ६२
६) एकूण : ५४०
फोटो : ०१केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाड शहर वाहतूक शाखेच्यावतीने गुरुवारी महामार्गावर विशेष मोहिमेअंतर्गत वाहनांवर कारवाई करण्यात आली.