जिल्ह्यात सर्वत्र ‘थर्टी फस्ट’चं फिव्हर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:10 PM2017-12-29T23:10:48+5:302017-12-29T23:11:56+5:30

Thirty-five favors of the district everywhere! | जिल्ह्यात सर्वत्र ‘थर्टी फस्ट’चं फिव्हर !

जिल्ह्यात सर्वत्र ‘थर्टी फस्ट’चं फिव्हर !

Next


सातारा : सरत्या वर्षाला निरोप देणं अन् नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सातारकरांवर सध्या थर्टी फस्टच्या पार्टीचे फिव्हर चढले आहे. नववर्ष स्वागतासाठी शहरातील सर्व हॉटेल सज्ज झाले असून, यंदा पहिल्यांदाच सातारकरांना हॉटेलमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाबरोबरच बार्बीक्यूचा आस्वाद घेता येणार आहे.
कटू गोड आठवणींचा संचय घेऊन आगामी वर्षात पर्दापण करताना नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाण्याचा संकल्प सातारकरांनी केला आहे. सरत्या वर्षाचे आभार मानून नवीन वर्षाचे स्वागत आप्तेष्टांबरोबर जल्लोषी वातावरणात व्हावे, यासाठी अनेकांनी उत्कृष्ट नियोजनाचे बेत आखले आहेत. सातारकरांचा सेलिब्रेशन मूड लक्षात घेऊन यंदा खाण्याबरोबरच संगीत आणि खेळांच्या कार्यक्रमाचेही आयोजन हॉटेल व्यावसायिकांनी केले आहे. काहींनी तर वैयक्तिक पॅकेज जाहीर करून त्यात स्टार्टर, जेवणासह आतषबाजीचीही सोय केली आहे.
शहरातील हॉटेल व्यवसाय वाढत असतानाच सातारकरांना महानगरांमध्ये असलेल्या बार्बीक्यूची कमतरता भासत होती. कित्येकदा यासाठी मोठ्या शहरांमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यालाही पसंती दिली होती. सातारकरांचे हे शल्य लक्षात घेऊन यंदा पहिल्यांदाच साताºयात मोजक्या हॉटेलमध्ये बार्बीक्यूची सोय करण्यात आली आहे. टेबलवर कोळसा ठेवून त्यावरचे गरमागरम तंदूर खाण्याची सातारकरांची इच्छा यंदा साताºयातच पूर्ण होत असल्याने तरुणाईनेही या हॉटेलमध्ये बुकिंग केले आहे.
नववर्ष स्वागतासाठी हॉटेलमधील गर्दी आणि गोंगाट लक्षात घेता काहींनी खासगी ठिकाणी जेवण तयार करून घेऊन ते निसर्गात खाण्याचाही बेत आखला आहे. ३१ डिसेंबरला रविवार असल्यामुळे यंदा कास पठारावर दुपारच्या वेळेत झाडाखाली स्वयंपाक करून त्यावर ताव मारण्याचेही नियोजन काही कुटुंबात रंगले आहे. कोणी घरातच मित्र परिवाराबरोबर पार्टीच्या मूडमध्ये आहे.
आॅक्रेस्ट्रा अन् आतषबाजींचा खेळ नववर्ष स्वागतासाठी येणाºया सातारकरांच्या करमणुकीसाठी यंदा हॉटेलमध्ये खेळही रंगणार आहे. कास पठारावरील अनेक हॉटेलमध्ये येणाºया ग्राहकांसाठी ही विशेष सोय करण्यात येणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी
महाबळेश्वरनगरी सज्ज !

महाबळेश्वर : नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरनगरी सज्ज झाली असून, येथे पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. आल्हाददायक वातावरणात पर्यटक विविध प्रेक्षणीय स्थळांवर गर्दी करीत आहेत. वेण्णा लेक परिसरात नौकाविहाराचा आनंद लुटण्यासोबतच पर्यटक चटपटीत पदार्थांवर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत.
महाराष्ट्राचे प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये शनिवार, रविवार जोडून आलेल्या सुट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिकांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईसह बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने बाजारपेठेला झळाळी मिळाली असून, पर्यटक सेल्फी घेताना पाहावयास मिळत आहेत. येथील दुकानेही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. येथील प्रसिद्ध वस्तूंच्या पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. ऐन थंडीत पर्यटक प्रसिद्ध स्ट्रोबेरी ज्यूस, क्रीम, आईसक्रीम, आईस गोळ्यावर ताव मारताना दिसत आहेत. वेण्णा लेक, मुंबई पॉर्इंट या परिसरामध्ये घोडेसवारीचाही आनंद लुटताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांतून येणाºया पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. हॉटेल्स लॉजेससाठी पर्यटक विविध साईट्सच्या माध्यमातून आॅनलाइन बुकिंगचा वापर करताना पाहावयास मिळत आहेत.

Web Title: Thirty-five favors of the district everywhere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.