पस्तीस ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:18 AM2017-10-06T00:18:48+5:302017-10-06T00:18:48+5:30

Thirty five gram panchayats uncontested | पस्तीस ग्रामपंचायती बिनविरोध

पस्तीस ग्रामपंचायती बिनविरोध

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील ३१९ पैकी ३५ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाल्याचे गुरुवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. रात्री दहा वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार इतरही काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींच्यामार्फत सुरू होते.
सातारा तालुक्यातील करंजे तर्फ परळी, न्हाळेवाडी, कामेरी, गोगावलेवाडी, माळ्याचीवाडी, खावली, भरतगाववाडी, रेणावळे, मत्त्यापूर या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. नित्रळ ग्रामपंचायतीसाठी अर्जच दाखल झाला नसल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमावा लागणार असल्याचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले. तसेच उर्वरित २८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. आसगावात सरपंचपदासाठी व वॉर्ड ३ मध्ये सदस्यपदासाठी, बेंडवाडीत केवळ सरपंचपदासाठी, कोंढवलीत सरपंच व वॉर्ड क्रमांक १ मध्ये, तसेच केळवलीत केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील ५१ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अंबवडे संमत कोरेगाव, खडखडवाडी, सायगाव पुनर्वसित, शेल्टी, अनबनवाडी, रामोशीवाडी, खामकरवाडी, दिघेवाडी, जगतापवाडी, कवडेवाडी, न्हावी बुद्रुक, वेलंग (शिरंबे), मोरबेंद या १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३८ ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी अथवा चौरंगी लढत होणार आहे. वडाचीवाडी, भावेनगर, बनवडी येथील सर्व सदस्य बिनविरोध झाले. मात्र, या तिन्ही गावांमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.
माण तालुक्यातील तीस पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. बिदाल, दीडवाघवाडी, पूळकोटी, अनभुलेवाडी, दीवड, पळशी या सहा ग्रामपंचायतींचा बिनविरोधमध्ये समावेश आहे. बनगरवाडी, चिलारवाडी, पळशी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील
६ ग्रामपंचायतींपैकी रामेघर, लाखवडी, खामील चोरगे, रुळे, व्यंगळे या
ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर
गोगवे या एकमेव ग्रामपंचायतीची
निवडणूक होणार आहे. वाई तालुक्यात ७ तर खंडाळ्यात असवली व शिरवळ या दोन मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे.
फलटण तालुक्यांमध्ये प्रशासनाची उशिरापर्यंत अर्ज माघारीची मोजदाद सुरू होती. निवडणूक यंत्रणेने कोणतीही माहिती देताना अत्यंत गोपनीयता पाळल्याने उशिरापर्यंत या तालुक्यांतील माहिती मिळू शकली नाही.
खटाव तालुक्यातील पंधरापैकी मरडवाक व भूषणगड ग्रामपंचायत बिनविरोध झाली. १९६ सदस्यांपैकी ३६ सदस्य बिनविरोध झाले. १६० सदस्य निवडीसाठी सोमवार दि. १६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
कºहाड तालुक्यातील ४४ पैकी सात सरपंच तसेच ८१ सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. सरपंचपदासाठीच्या ६२ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. सदस्यपदासाठी अर्ज दाखल केलेल्या ३३६ उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले.

Web Title: Thirty five gram panchayats uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.