जावळीत दगडांची झाली फुले! मानकुमरे उदयनराजेंच्या प्रचारात : मतभेद विसरून होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:04 PM2019-04-06T13:04:25+5:302019-04-06T13:06:50+5:30

राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत

Thorns of stones! In the propagation of Stadmayor Udayan Rajaz: Active rallies will be forgotten | जावळीत दगडांची झाली फुले! मानकुमरे उदयनराजेंच्या प्रचारात : मतभेद विसरून होणार सक्रिय

जावळी तालुक्यात प्रचाराच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबरीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हेही एकत्र दिसून येऊ लागले आहेत. 

Next
ठळक मुद्देराजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सिद्ध होते, अशी चर्चा सातारा,

सातारा : राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत प्रचारास सुरुवात केली. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ या वळणावर, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या साक्षीने दोघांनी मैत्रीचे संबंध पुनर्स्थापित केले. दरम्यान, यामुळे जावळीत दगडांची झाली फुले, अशी चर्चा आता ऐकायला मिळू लागली आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार उदयनराजे भोसले हे तिसºयांदा राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याशी त्यांची वादावादी झाली होती. तसेच उदयनराजे व त्यांच्यात राजकीय भूमिकेवरून मतभेद निर्माण झाले. हे मतभेद गेल्या दीड वर्षात अगदी टोकापर्यंत गेले होते. वाहनांवर दगडफेक करण्यापर्यंत प्रकरण गेले होते. एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद गेला होता. 

त्यावेळी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत होत्या. या दोन नेत्यांचा संघर्ष टोकाचा झाला होता. त्यामुळे पोलिसांना हे दोन नेते कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना प्रचंड खबरदारी घ्यावी लागत होती.
मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाले गेले विसरून हे दोन्ही नेते जावळी तालुक्यातील प्रचार दौºयात सक्रिय झाल्याने नागरिकही आवक झाले आहेत. 

मेढा, करहर, कुडाळ, हुमगाव, म्हसवे, बामणोली आदी ठिकाणी झालेल्या प्रचार सभा, बैठका व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना ते दिसून आले. तसेच ऐकमेकांशी दिलखुलासपणे चर्चा करीत असताना दिसले. त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सिद्ध होते, अशी चर्चा सातारा, जावळी तालुक्यांमध्ये सुरू आहे.

 

Web Title: Thorns of stones! In the propagation of Stadmayor Udayan Rajaz: Active rallies will be forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.