पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:54+5:302021-07-25T04:32:54+5:30
रामापूर : पाटण तालुक्यात चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरात डोंगर खाली येत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाटण तालुक्यातील मिरगाव, ...
रामापूर : पाटण तालुक्यात चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरात डोंगर खाली येत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाटण तालुक्यातील मिरगाव, हुबरळी, ढोकवले, किल्ले मोरगिरी, धावडे शिदुकवाडी, नेरळे, तारळे, पांढरवाडी, नावाडी वेताळवाडी, दिक्षी, धावडे या गावातील सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
पाटण तालुका चार खोऱ्यात डोंगर पायथाशी वसलेल्या आहे. मात्र तालुक्यात चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील डोंगराचे भुस्खलन होण्यास सुरुवात झाली. या भुस्खलनामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणची शेती वाया गेली आहे. कवडेवाडी येथे ही भुस्खलनामुळे अनेक एकर शेती माती खाली गेली आहेत.
पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथे अतिवृष्टीमुळे भुस्खलनामुळे अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली खाली अडकले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाच्या मिरगाव येथील १०३, हुबरळी ८५, ढोकवले ३५०, किल्ले मोरगिरी ३००, धावडे शिडुकवादी १५, नेरळे १०४, तारळे, पांढरवाडी १४, धावडे दिक्षी ४०, तर पुराच्या पाण्यामुळे नावडी २८, वेताळवाडी १२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.