हजारमाची विलगीकरण कक्ष ‘रोल मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:54+5:302021-05-27T04:40:54+5:30
हजारमाची, ता. कऱ्हाड येथील शाळेत सुरू असलेल्या विलगीकरण कक्षास दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, ...
हजारमाची, ता. कऱ्हाड येथील शाळेत सुरू असलेल्या विलगीकरण कक्षास दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, मंडल अधिकारी विनायक पाटील, डॉ.अनिकेत पालसांडे, सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना नाश्ता, जेवण, उपचार व औषधोपचार पूर्ण मोफत देण्यात येत आहे. डॉ.अनिकेत पालसांडे व डॉ.आनंद पवार हे गावातील दोन डॉक्टर विलगीकरण कक्षातील रुग्णांना विनामूल्य सेवा देत आहेत. आत्तापर्यंत ११ रुग्णांवर येथे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत, तर पाच रुग्ण उपचार घेत आहेत.
यावेळी कल्याणराव डुबल, जगन्नाथ काळे, अवधूत डुबल, प्रल्हादराव डुबल, विश्वासराव पाटील, दीपक लिमकर, पराग रामुगडे, सर्जेराव पानवळ, मुरारजी माने, मिलिंद सुर्वे, धनाजी माने आदी उपस्थित होते.
- चौकट
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना
भेटीदरम्यान विलगीकरण कक्षातील रुग्णांना लोकवर्गणीतून औषधपुरवठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला. विलगीकरण कक्षास औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
फोटो : २६केआरडी०४
कॅप्शन : हजारमाची, ता.कऱ्हाड येथील विलगीकरण कक्षास भेट देऊन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आढावा घेतला.