हजार, पाचशेने केली तब्बल दोन कोटींची वसुली!

By Admin | Published: November 13, 2016 12:09 AM2016-11-13T00:09:38+5:302016-11-13T01:13:47+5:30

कऱ्हाड पालिका : पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारत वसुली; करवसुली विभाग जोमात

Thousands, five hundred and fifty crores of recovery! | हजार, पाचशेने केली तब्बल दोन कोटींची वसुली!

हजार, पाचशेने केली तब्बल दोन कोटींची वसुली!

googlenewsNext

कऱ्हाड : आपल्याकडील असलेल्या पाचशे, हजारांच्या नोटा कुठे खर्च करायच्या असा थकबाकीदारांना प्रश्न पडला. मात्र, यावर पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी तोडगा काढीत प्रशासनास
करवसुली करताना पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना
केल्या. पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारणार असल्याची माहिती सोशल मीडियासह सर्वत्र देत पैसे भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्यास प्रतिसाद देत थकबाकीधारकांनी पैसे तत्काळ भरले. पाचशे, हजारांच्या वसुली करीत पालिकेने वीस दिवसांत तब्बल दोन कोटी रुपयांची वसुली केली.
पालिकेच्या कर थकबाकीमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी, वीजकर, अग्निशामक, आरोग्यकर, सफाईकर अशा प्रकारच्या सात करांचा समावेश होतो. वर्षभर पालिकेच्या सुविधांचा वापर करणाऱ्या थकबाकीदार व गाळेधारकांकडून पालिका निवडणुकीचे औचित्य साधत तसेच पाचशे, हजारांच्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे करवसुली करण्याचा पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी निर्णय घेतल्यामुळे संबंधित थकबाकीची रक्कम वसूल करता आली.
पालिका प्रशासनाने केलेल्या कडक नियमांमुळे अनेक थकबाकीधारक उमेदवारांनीही तत्काळ थकबाकी रक्कम भरली.
कऱ्हाड पालिकेचा वर्षभर कर चुकविणाऱ्या थकबाकीदारांना आतापर्यंत तब्बल दोन कोटी
रुपये थकबाकीची रक्कम भरली
आहे. नव्वद टक्के करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेकडून ना-ना तऱ्हेचे प्रयत्न करण्यात
आले. पालिकेतील करवसुली प्रमुख व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर केलेल्या वसुलीच्या कारवाईतून तब्बल बारा कोटी थकबाकीची रक्कम पालिकेला जमा करता करता आली. त्यानंतर आता वीस दिवसांत तब्बल दोन कोटी रुपये इतकी थकबाकीची रक्कम वसूल झाली आहे. पाचशे,
हजारांच्या नोटा स्वीकारल्याने पालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडली आहे.
वर्षभर पालिकेच्या सुविधांचा वापर करणाऱ्या थकबाकीदार व गाळेधारकांकडून पालिका निवडणुकीच्या निमित्ताने करवसुली करण्याचा पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी निर्णय घेतल्यामुळे संबंधित थकबाकीची रक्कम वसूल करता आली. पालिका प्रशासनाने केलेल्या कडक नियमांमुळे अनेक थकबाकीधारक इच्छुक उमेदवारांनीही तत्काळ थकबाकी रक्कम भरली. (प्रतिनिधी)

सोशल मीडियावरून आवाहन
पाचशे तसेच एक हजारांची नोट चालणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत सर्वात जास्त व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक अशा सोशल मीडियावरून चर्चा झाली. नोट चालणार नसल्याने त्याचे करायचे काय याबाबत अनेक उपायही सुचविले गेले. मात्र, अशात पालिकेत करभरण्यापोटी पाचशे तसेच एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे आवाहन करण्यासाठी ‘खूशखबर, खूशखबर’ ‘सुवर्र्णसंधीचा लाभ घ्या’ असे आवाहन करणारी पोस्ट मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी टाकल्यास त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.


केंद्र सरकारने पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. याचा विचार करीत वर्षानुवर्षे कर थकविणाऱ्या थकबाकीधारकांनी आपली थकीत रक्कम पाचशे, हजारांच्या नोटा असल्यास त्या पालिकेत भरल्यास त्या स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पालिकेत येऊन वीस दिवसांत थकबाकीची रक्कम भरली.
- विनायक औंधकर, मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका

Web Title: Thousands, five hundred and fifty crores of recovery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.